पंकजा मुंडे भाजप सोडणार, ‘या’ पक्षात करणार प्रवेश?

पंकजा मुंडे भाजप सोडणार, ‘या’ पक्षात करणार प्रवेश?

मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लिहिलेल्या पोस्टमुळे त्या राजकारणात मोठा निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्या भाजप सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या कोणत्या पक्षात जाणार याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. पकंजा मुंडे या मातोश्रीच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबधांमुळे पंकजा मुंडे यांनाही मातोश्रीने कधीच अंतर दिले नाही. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना झाला त्यावेळी देखील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांना बहिण माणून त्यांच्या विरोधात परळीमधून उमेदवार दिला नाही. तसेच प्रितम मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीतही बीड जिल्ह्यातील शिवसेनेची सर्व फौज त्यांच्या पाठीशी उभी केली होती. त्यामुळे पंकजा आणि प्रितम यांच्याशी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरही मातोश्रीने कौटुंबीक जीव्हाळा कायम ठेवला आहे.

आता पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत परळीमधून पराभव झाल्यानंतर हा पराभव भाजप पक्षाअंतर्गत असलेल्या राजकारणामुळेच झाल्याचं ठाम विश्वास पंकजा मुंडे समर्थकांकडून केला जातोय. त्यामुळे येत्या १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिवशी पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्याता आहे. पंकजा मुंडे यांना भाजपला सोडचीठ्ठी दिल्यास कौटुंबीक नात्यामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

COMMENTS