फक्त पंकजा मुंडेच नाही तर भाजपचे हे ज्येष्ठ नेते बंडाच्या तयारीत ?

फक्त पंकजा मुंडेच नाही तर भाजपचे हे ज्येष्ठ नेते बंडाच्या तयारीत ?

मुंबई – राज्यातील भाजपचे काही ज्येष्ठ नेते पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पंकजा मुंडे यांची उघड उघड नाराजी दिसत आहे. तर पंकजा मुंडे यांच्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्वपक्षावर आरोप केला आहे.
रोहिनी खडसे आणि पंकजा मुंडे या पडल्या नाहीत तर त्यांना पाडण्यात आलं असल्याचा आरोप नुकताच एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसेही बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह बोरिवलीतून विनोद तावडे, घाटकोपरमधून प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे आधीच हे नेते राज्यातील भाजप नेतृत्वावर नाराज आहेत. त्यातच पंकजा मुंडे
या पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत या नेत्यांनीही बंड पुकारले तर राज्यात पक्षाची अवस्था बिकट होऊ शकते असा अंदाज मांडला जात आहे.

COMMENTS