मुंडेंचा वारस होणे सोपे नाही – पंकजा मुंडे

मुंडेंचा वारस होणे सोपे नाही – पंकजा मुंडे

अहमदनगर – मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज चिचोंडी शिराळ, ता पाथर्डी व ढोरजळगांव ता. शेवगांव येथे मोठ्या थाटात पार पडला. ६४ कोटी रुपयांच्या या योजना आहेत. यावेळी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न हे त्यांच्या परिवारासाठी नव्हते तर जनतेच्या विकासाचे होते. ते पूर्ण करण्यासाठीच मी आज येथे आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. तसेच मुंडेंचा वारस होणे सोपे नाही त्यासाठी लागणारी मेहनत व अपार कष्ट मी आज घेत आहे. बेरजेचं राजकारण करायच त्यांनी मला शिकवल असं सांगून माझं सर्व आयुष्य हे जनसेवेसाठी असल्याचे त्या म्हणाल्या.कार्यक्रमास खा.दिलीप गांधी, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. बाळासाहेब मुरकूटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंधरा वर्ष ज्या  काँग्रेस राष्ट्रवादीनी सत्तेत असतांना सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारला तेच  आता हल्लाबोल व संघर्ष यात्रा काढत आहेत अशा यात्रा यांना शोभत नाही कारण यांनी कधी जनतेसाठी संघर्षच केला नाही आणि पाहिलाही नाही. आडवा आणि जिरवा हे धोरण या लोकांनी जनतेसाठीच राबवले असा घणाघात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केला. दरम्यान कुणी कितीही यात्रा काढल्या तरी २०१९ मध्ये भाजपचा विकासच जनतेला बोलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ना पंकजाताई मुंढे म्हणाल्या, विकास कामांच्या जोरावरच पुढील लोकसभा विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार असुन सत्तर वर्ष ज्यांनी देशावर सत्ता गाजवली ते आता आम्हाला पाच वर्षाचा हिशोब विचारत आहेत . राज्यात तीस हजार कोटींची रस्त्यांची कामे आम्ही पुर्ण केली आहेत. नगर जिल्हयात १३६१ किमीचे रस्ते डांबरीकरणाने जोडले जाणार असुन त्यासाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे . राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील १२० किमीचे रस्ते डांबरीकरणाने जोडले जाणार असुन त्यासाठी ६६ कोटी रूपये देणार असल्याचे सांगत आ. कर्डिले लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे आवडते आमदार होते यापुढील काळातही त्यांच्या सुख दुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहणार आहे, आ. मोनिका राजळे माझी बहीण आहे तीला देखील कशाचीही अडचण भासू देणार नाही.

विरोधकांचा घेतला समाचार

विरोधकांची संघर्ष यात्रा म्हणजे एक बनाव आहे. संघर्ष यात्रेपेक्षा स्टेजवर बसणाऱ्यांची संख्या मोठी असते . संघर्ष लोकनेते मुंडे साहेबांनी पाहिला आणि अनूभवला देखील संघर्षाची भाषा विरोधकांना शोभत नाही अशा शब्दात ना मुंढेंनी विरोधकांवर निशाणा साधला. जलयुक्त शिवार सारखी योजना प्रभावीपणे राबवून आम्ही जनतेला पाणी दिले. राज्य दुष्काळमुक्त करण्यावर आम्ही भर दिला. राष्ट्रवादीने मात्र सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा करून आडवा आणि जिरवा हे धोरण फक्त जनतेसाठीच राबविले असल्याची टीका त्यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. कर्डीले यांनी केले. सुरवातीला मुंडे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. ना. पंकजाताई मुंडे यांचे गावोगांवी जंगी स्वागत झाले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी ग्रामस्थ विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS