तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, अमोल कोल्हेंनंतर पंकजा मुंडेंचा निर्धार!

तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, अमोल कोल्हेंनंतर पंकजा मुंडेंचा निर्धार!

बीड – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नमिता मुंदडा आणि धनंजय मुंडे यांच्या प्रचारादरम्यान बीडमधील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना गुलाल लागणार तोपर्यंत फेटा बांधणार नसल्याचा निर्धार केला होता. त्यानंतर आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही असाच निर्धार केला आहे. बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा निश्चय पंकजा मुंडे यांनी केला आहे. आष्टी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे हे उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. माझ्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हे काही नवीन नाही. गोपीनाथ मुंडे असतानादेखील सगळ्यांचं लक्ष लागायचं. राष्ट्रवादीची लोक खोटा प्रचार करतात की पंकजा मुंडेना भीती वाटते. मी महाराष्ट्रभर प्रचार करुन माझा मतदारसंघ सांभाळते. मला महाराष्ट्राची चिंता आहे केवळ माझ्या मतदारसंघाची नाही असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS