पोकळ गप्पा मारण्यापेक्षा गांवोगावचा विकास करण्यावर आमचा भर – पंकजा मुंडे

पोकळ गप्पा मारण्यापेक्षा गांवोगावचा विकास करण्यावर आमचा भर – पंकजा मुंडे

परळी – विकासाच्या नावाखाली पोकळ गप्पा मारणे हे आमच्या रक्तात नाही. जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पूर्तता करत प्रत्यक्ष कृतीतुन गांवोगांवचा विकास साधण्याचे काम आम्ही करत आहोत असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले.

लिंबोटा येथे ग्रामविकास विभागाच्या २५१५ व इतर निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच राज्य महिला आयोग आणि वैद्यनाथ महिला बचतगट महासंघाच्या वतीने बचतगटांच्या महिलांना कुक्कूटपक्षांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितम मुंडे होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आईची माया दाईला येत नसते . तुमच्या सर्वांगिण विकासासाठी जो शब्द दिला होता तो पूर्ण करत आहोत केवळ पोकळ गप्पा मारून तुमचा विकास होणार नाही तर त्यासाठी कृती आवश्यक आहे. लिंबोटा गावाला गेल्या चार वर्षांत विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. कारण लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे या गावावर विशेष प्रेम होते. लिंबोटा गावच्या महिला मुलींना बचत गटाच्या माध्यमातून आम्ही सक्षम करत आहोत. याठिकाणी बचतगटांच्या महिलांना २२ लाख रूपयांची मदत केली आहे. गावच्या सर्वांगिण विकासात महिला मुलींची भूमिका महत्वाची असल्याने त्यांच्या सक्षमीकरणावर आमचा भर असल्याचे यावेळी मुंडे म्हणाल्या. मतदारसंघातील प्रत्येक गावांत मी न मागता निधी दिला आहे. ग्रामीण भागात २५१५ चा निधीतून मुलभूत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. यापूर्वी हा निधी कोणालाही माहित सुध्दा नव्हता तो माझ्यामुळे माहित झाला हे विरोधकांनाही मान्य करावे लागेल. परळी तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही भगिनी कटिबद्ध आहोत असे आश्वासन यावेळी पंकजाताईंनी उपस्थित गावकऱ्यांना दिले. तर येणाऱ्या काळात पोकळ गप्पा मारून खोटे आश्वासन देणारा नाही तर कृतीतुन विकास साधणाराला साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खा.डॉ.प्रितम मुंडे

लिंबोटा गावचे पुनर्वसन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केले आहे म्हणजे गाव बसवण्याचे काम मुंडे साहेबांनी केले तर गावचा विकास करून गाव घडवण्याचे काम पंकजा करत आहेत असे यावेळी खा.मुंडे म्हणाल्या.

महिलांना कुकूट पक्षी वाटप

प्रारंभी पंकजा मुंडे यांनी अंतर्गत रस्ते, सभागृह, दलित वस्तीत रस्ते, शाळा दुरूस्ती, ग्रामपंचायत कार्यालय आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. राज्य महिला आयोग व वैद्यनाथ बचत गट महासंघातर्फे लिंबोटा येथील महिलांना ‘ग्रामप्रिया” या जातीच्या कुकूट पक्षांच्या पिलांचे वाटप पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, भीमराव मुंडे, सरपंच सुदाम मुंडे, माधवराव मुंडे, ज्ञानोबा मुंडे, सतीश मुंडे, बिभीषण फड, रामेश्वर मुंडे, राजाभाऊ फड, राजेश गिते, रविंद्र कांदे, पवन मुंडे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन माजी सरपंच मोहन मुंडे यांनी केले.

COMMENTS