पंकजा मुंडे यांनी केले शहीद जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांचे सांत्वन !

पंकजा मुंडे यांनी केले शहीद जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांचे सांत्वन !

बीड – नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पाटोदा येथील जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजामुंडे यांनी आज भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व धीर दिला. राज्य सरकार तौसिफ कुटुंबियांच्या पाठिशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानही सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पाटोदा येथील शेख तौसिफ शेख आरेफ हा जवान शहीद झाला होता. पालकमंत्री पंकजा मुंडे आज जिल्ह्यात दुष्काळी दौ-यावर आल्या असता पाटोदा येथे जाऊन त्यांनी शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शेख तौसिफ जिल्ह्याचे भूमीपुत्र आहेत, त्यांनी नक्षलवाद्यांशी लढताना आपले प्राण दिले, त्यांच्या आई वडिलांना मी भेटले, सरकार त्यांच्या कुटूंबियांच्या मागे खंबीरपणे उभा आहे असे सांगून नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही,हा जिल्हा त्यांचे बलिदान व शौर्य कदापी विसरणार नाही अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.

यावेळी शेख तौसिफ यांचे वडील शेख आरेफ, आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राजेंद्र मस्के, संतोष हंगे, सुधीर घुमरे, राजेंद्र बांगर आदी उपस्थित होते.

COMMENTS