‘या’ पदावरुन पंकजा मुंडे भाजपवर नाराज ?

‘या’ पदावरुन पंकजा मुंडे भाजपवर नाराज ?

मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लिहिलेल्या पोस्टमुळे त्या राजकारणात मोठा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्या भाजप सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या कोणत्या पक्षात जाणार याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. पकंजा मुंडे या मातोश्रीच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी इच्छुक असल्याचं समजत आहे. विधानसभा निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरीही विधानपरिषदेच्या माध्यमातून पंकजा मुंडे या पुन्हा सभागृहात येण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. याचवेळी त्यांना विधानपरिषदेचं विरोधी पक्ष नेते पद देखील हवं असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. परंतु या पदासाठी भाजपे वरिष्ठ नेते सकारात्मक नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्या भाजपशिवाय दुसरा विचार करणार नाहीत. भाजप नेते गोपीनाथ गडावर जाणार असून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं मन वळवण्यात भाजपला यश येणार का? हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS