‘हे’ धनंजय मुंडेंचं एकमेव ध्येय – पंकजा मुंडे

‘हे’ धनंजय मुंडेंचं एकमेव ध्येय – पंकजा मुंडे

मुंबई – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. खोटं बोल पण रेटून बोल आणि माझ्यावर आरोप कर हे धनंजय मुंडेंचं एकमेव ध्येय असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये भाजपला मतदान न झालेल्या बूथची यादी मागवली असा आरोप करत ईव्हीएम हॅकिंगची शंका असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यावर पंकजा मुंडे यांनी ते माझे बंधू आहेत, त्यांना लहानपणापासून ओळखते, खोटं बोल पण रेटून बोल एवढंच ते करतात, असं म्हटलं आहे.

दरम्यान निकालानंतर आपल्याला कोणत्या भागात किती मतदान झालं याची माहिती प्रत्येक नेत्यालाच मिळते. शिवाय निवडणुकीत कोणत्या भागातून आपल्याला किती मतदान झालं याचा आढावा प्रत्येक जण घेतो, धनंजय मुंडेंनीही तो आढावा घेतलाच असेल. मग यात गैर काय असा सवालही पंकजा मुंडेंनी केला आहे. तसेच एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. पण महाराष्ट्रात युतीला 38-44 जागा मिळतील, असा अंदाज पंकजा मुंडेंनी व्यक्त केला आहे.

 

COMMENTS