धनंजय मुंडेंना तेव्हा नाकही पुसता येत नव्हतं -पंकजा मुंडे

धनंजय मुंडेंना तेव्हा नाकही पुसता येत नव्हतं -पंकजा मुंडे

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना रंगला असल्याचं दिसत आहे. कारण या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
नाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. तसेच हिंमत असल्यास बीडची लोकसभा निवडणूक लढवा, उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. अर्ज भरा आणि खुशाल मैदानात या असं खुलं आव्हानही पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना दिलं आहे.

दरम्यान स्वतः मागच्या दारानं यायचं आणि लोकांना पुढे करायचं, हे बीडची जनता कधीच सहन करणार नाही, तसेच राष्ट्रवादीला त्यांच्याच पायगुणाने वाळवी लागली असून आधी पाच आमदार होते, जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात राजकारण केलं.ते आज त्यांच्या मंचावर नाहीत. विमलताई मुंदडा गटदेखील नाराज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं काय ये अंदर की बात है, पुरी राष्ट्रवादी हमारे साथ है असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS