वनगा या झाडाची फळं दुसऱ्यांच्या पदरात पडली याचं दुःख – पंकजा मुंडे

वनगा या झाडाची फळं दुसऱ्यांच्या पदरात पडली याचं दुःख – पंकजा मुंडे

पालघर –  पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जव्हार या ठिकाणी भाजपनं आज सभा पार पडली. यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे या उपस्थित होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. तसेच पंकजा मुंडे यांनीही शिवसेनेला टोला लगावला आहे. गोपीनाथ मुंडे आणी वनगा यांचे निकटचे संबंध होते.  वनगा कुटुंब सदैव आमच्यासोबत असायला हवे होते. तसेच वनगा या झाडाची फळ दुसऱ्यांच्या पदरात पडले हे दुःख असल्याचा टोला पंकजा मुंडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

दरम्यान भाजपनं 58 हजार लोकांना कौशल्य विकास अंतर्गत रोजगार दिला असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तसेच पर्यटन क्षेत्र आणी एमआयडीसीला चालना मिळाली पाहिजे असंही मुंडे यांनी म्हटलं असून 2019 पर्यंत पालघरमधील प्रत्येकाला पक्क घर देऊ असं आश्वासनही या पंकजा मुंडे यांनी पालघरवासीयांना दिलं आहे.

COMMENTS