‘त्या’ सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेला पंकजा मुंडेंकडून स्थिगिती !

‘त्या’ सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेला पंकजा मुंडेंकडून स्थिगिती !

बीड  सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्थगिती दिली आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर पंकजा मुंडे यांनी फेरसुनावणी घेऊन हा निर्णय दिला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीसाठी या सहा सदस्यांच्या मतदानाचा भाजपला फायदाच होणार आहे. या  सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती न दिल्यास त्यांना त्यांच्या लोकशाहीतील मतदानाच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहावे लागेल आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना असणाऱ्या हक्काला बाधा पोहचेल. त्यामुळे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देणं आवश्यक असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अपिलार्थीच्या वकिलांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे गटनेते बजरंग सोनावणे यांची गटनेता म्हणून निवड झाली. मात्र गटनेता निवडीच्या बैठकीची वैधता तपासणे आवश्यक आहे. सोनावणे यांनी काढलेला व्हिप सर्व अपिलार्थींना नियमानुसार बजावला आहे किंवा कसे, हेही तापसणे आवश्यक असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS