जानकरांनी धाकट्या भावोजींना स्टेजवरच उचललं, प्रितम मुंडे म्हणाल्या त्यांना रासपत घ्या !

जानकरांनी धाकट्या भावोजींना स्टेजवरच उचललं, प्रितम मुंडे म्हणाल्या त्यांना रासपत घ्या !

बीड भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी आपल्या पतीला रासपत घेण्याचं आवाहन रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना केलं आहे. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे आज दसरा मेळावा घेतला. या दरम्यानन महादेव जानकर यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी प्रीतम मुंडे यांचे पती डॉ. गौरव खाडे यांना उचलून घेतले. त्यावेळी प्रितम मुंडे यांनी आपले पती म्हणजेच गौरव खाडे यांना रासपत घेण्याचं आवाहन महादेव जानकरांना केलं.

दरम्यान प्रीतम मुंडे यांचे भाषण सुरु असताना त्यांनी व्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेण्यास सुरुवात केली. पती डॉ गौरव खाडे यांचे नाव घेताच कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर केला. तेव्हा, “मला वाटले होते थोरल्या भावोजींचेच पाठीराखे खूप आहेत, पण धाकट्या भावोजींनाही मोठे फॅन फॉलोईंग आहेत, जानकर साहेब तुम्ही त्यांना रासपत घेण्यास हरकत नाही” अशी कोपरखळी प्रीतम यांनी मारली, आणि जानकर यांनी त्यावर कडी करत लगेच डॉ. गौरव खाडे यांना उचलून घेतले.

 

COMMENTS