पनवेलमध्ये ‘या’ पक्षाला मोठं खिंडार, पाच नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश !

पनवेलमध्ये ‘या’ पक्षाला मोठं खिंडार, पाच नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश !

पनवेल – पनवेलमध्ये भाजपची ताकद वाढली असून पाच नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे शेतकरी कामगार पक्षात मोठं खिंडार पडले आहे. पनवेलमधील नगरसेवक हरीश केणी यांच्यासह पाच नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच हे सर्व नगरसेवक माजी पालमंत्री रवींद्र चव्हाण, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान पनवेल महापालिकेत शेकापचे 23 नगरसेवक आहेत. यातील चौघा जणांनी आधीच शेकापला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेत भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. हरीश केणी यांनी पक्ष सोडताना शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत पाटील आणि स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. शेकापमध्ये पैसेवाल्यांना पदे दिली जात असून फक्त कॉन्ट्रॅकरनाच न्याय दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

COMMENTS