धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंचा धक्का, ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश!

धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंचा धक्का, ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश!

बीड – परळी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडेंनी जोरदार धक्का दिला आहे. कारण काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस टीपी मुंडे यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. भाजपातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच टीपी मुंडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. तर पंकजा मुंडे यांची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान टीपी मुंडे यांचा एक मुलगा प्रदीप मुंडे जिल्हा परिषद सदस्य आहे, दुसरा मुलगा नगरसेवक आहेत. तर मुलगी युवा काँग्रेसची नेता असून या सर्वांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. परळीच्या निवडणुकीत टीपी मुंडे यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मतं मिळवलेली आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधातही टीपी मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टीपी मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS