82 वर्षीय नेता धनंजय मुंडेंसाठी मैदानात, दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा केला होता पराभव!

82 वर्षीय नेता धनंजय मुंडेंसाठी मैदानात, दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा केला होता पराभव!

बीड, परळी – विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राज्यातील काही मतदारसंघात तर चुरशीची लढत होत आहे. परळी मतदारसंघही त्यापैकीच एक आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे तर भाजपच्या पंकजा मुंडे या बहिण भावात ही लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी आता ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार पंडितराव दौंड हे मैदानात उतरले आहेत. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.

(

दरम्यान परळी रेणापूर मतदारसंघात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा दौंड यांनी पराभव केला होता. 1985 मध्ये परळी रेणापूर मतदारसंघात त्यांनी 3 हजार 500 मतांनी गोपीनाथ मुंडे यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात पंडितराव दौड यांचा जनसंपर्क दांडगा आहे.

तसंच जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. पंडितराव दौंड यांचे सुपुत्र संजय दौंड हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. सध्या पंडितराव दौंड आणि संजय दौंड यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

COMMENTS