गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रारंभ, थाटात पार पडले बौध्द, मुस्लिम दाम्पत्यांचे विवाह  !

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रारंभ, थाटात पार पडले बौध्द, मुस्लिम दाम्पत्यांचे विवाह !

परळी – गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात आज सकाळी मुस्लिम व बौध्द धर्मातील वधू – वरांचे शुभविवाह मोठ्या थाटात पार पडले. जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी यावेळी नव दाम्पत्यांना शुभाशिर्वाद दिले.

दुष्काळग्रस्त भागातील पालकांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील तोतला मैदानावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी मुस्लिम समाजातील तीन तर दुपारी बौध्द धर्मातील वीस वधू वरांचे विवाह त्या त्या धर्मातील रिती रिवाजानुसार उत्साहात पार पडले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खा डाॅ प्रितम मुंडे यांनी नव वधू वरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सायंकाळी मुख्यमंत्री येणार

सामुदायिक विवाह सोहळ्याचा मुख्य समारंभ सायंकाळी ६.०५ वा. होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार हे या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहेत. सायंकाळी ५ वा. त्यांचे शहरात आगमन होणार आहे. दरम्यान, दुपारी व-हाडींच्या लक्ष भोजनास सुरवात झाली आहे. अतिशय शिस्तबद्ध वातावरणात हा सोहळा संपन्न करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. सायंकाळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS