“…तर तुम्ही पण या मोदी साहेबांच्या सभेला!”, पंकजा मुंडेंचं व्हिडीओद्वारे विरोधकांना प्रत्युत्तर ! VIDEO

“…तर तुम्ही पण या मोदी साहेबांच्या सभेला!”, पंकजा मुंडेंचं व्हिडीओद्वारे विरोधकांना प्रत्युत्तर ! VIDEO

बीड, परळी – बीडमधील परळी मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना चांगलाच रंगला असल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १७ ऑक्टोबरला
परळीमध्ये सभा पार पडणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानच येत असल्यामुळे राष्ट्रवादीकडून भाजपवर टीका केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परळी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. तेच काय पण भाजपाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आणले, तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

भाजपा पराभवाच्या भीतीने मोठ-मोठे नेते आणत आहे. पण भारतातील नेत्यांबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी परळीत सभेला आले तरी माझा विजय निश्चित आहे असं मुंडे यांनी दोन दिवसापूर्वीच म्हटलं होतं. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. याद्वारे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या जोरदार टीका केली आहे.

COMMENTS