लोकसभेसाठी मराठवाड्यातील राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर !

लोकसभेसाठी मराठवाड्यातील राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर !

जालना – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची नावा जाहीर केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेसाठी मराठवाड्यातील पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.  परभणीतून राजेश विटेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती जालन्यातील घनसावंगी येथील सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून 2014 च्या निवडणुकीत विजय भांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील पक्षाचा तरुण चेहरा असलेल्या विटेकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वानं घेतला आहे. मागील निवडणुकीत सर्वत्र मोदीलाट असताना देखील पक्षाचे उमेदवार विजय भांबळे यांना पाच लाखांवर मते मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास पक्षाला आहे.

COMMENTS