परभणीतील शेतक-यांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, सहा शेतक-यांनी घेतलं विष !

परभणीतील शेतक-यांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, सहा शेतक-यांनी घेतलं विष !

परभणी – मानवत तहसिल कार्यालयात शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं असून एका शेतक-याची प्रकृती चिंताजनक आहे. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नावरून या शेतक-यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून मानवत पोलीस ठाण्याचे एपीआय पवार यांनी माहिती दिली आहे. परभणी जिल्ह्यातील मानोली येथील हे चार शेतकरी आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज परभणीत येणार असतांना सदर घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान मानवत तालुक्यातील मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिल रोजी तहसीलदारांना निवेदन दिले होते. यात गावातील गैरव्यवहाराची चौकशी करावी,गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,गावातील २२ बोगस बंधाऱ्याची चौकशी करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या समस्या न सोडविल्यास १९ फेब्रुवारी रोजी सामूहिक आत्महत्येचा इशारा सुद्धा दिला होता. निवेदन देऊन ही प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने आज ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाले. पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत लक्ष्मण शिंदे ,चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम ,शेख शगिर यांनी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी मानवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

COMMENTS