परभणीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला, अनेक गाड्यांची तोडफोड, एक बस जाळली !

परभणीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला, अनेक गाड्यांची तोडफोड, एक बस जाळली !

परभणी –  आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाजाचं राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन जास्तच चिघळत चाललं असल्याचं दिसत आहे. परभणीमध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटला असून या ठोक मोर्च्यात आंदोलनकांनी अनेक गाड्या पोडल्या आहेत. या तोडफोडीत 14 वाहनांचं मोठं नुकसान झालं असून तेरा वाहने फोडली आहेत तर एक बस पेटवून दिली आहे. त्यामुळे हे आंदोलन जास्तच चिघळत चाललं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान औरंगाबादमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाल्यामुळे हे आंदोलन जास्तच चिघळत असल्याचं दिसत आहे. कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजानं आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप करत  उद्यापासून ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर 9 ऑगस्ट क्रांती दिनी भव्य मोर्चा काढणार असल्याचंही या समितीनं म्हटलं आहे.

COMMENTS