परभणीत शिवसेनेला धक्का, उपजिल्हाप्रमुखाचा जय महाराष्ट्र !

परभणीत शिवसेनेला धक्का, उपजिल्हाप्रमुखाचा जय महाराष्ट्र !

परभणी – शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून उपजिल्हाप्रमुख संतोष मुरकुटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. खासदार संजय जाधव यांच्याकडून घुसमट होत असल्याने पक्ष सोडला असल्याचं उपजिल्हाप्रमुख संतोष मुरकुटे यांनी म्हटलं आहे. तसेच परभणीत खासदारांची एकाधिकारशाही असल्याचंही मुरकुटे यांनी म्हटलं आहे. यापूर्वी आमदार मोहन फड यांनी ही खासदारांवर आरोप करून पक्ष सोडला होता.

दरम्यान आगामी निवडणुकीच्या तोंडावर परभणीचे उपजिल्हाप्रमुख संतोष मुरकुटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला असल्यामुळे याठिकाणी शिवेसेनेला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणेज याठिकाणचे खासदार संजय जाधव यांच्या कामगिरीवरही पक्षातील पदाधिकारी नाराज असल्याचं दिसत आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ नेते काय दखल घेणार याकडे स्थानिक शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS