त्यामुळे गाडीच्या खाली उतरुन धावत सुटले पार्थ!

त्यामुळे गाडीच्या खाली उतरुन धावत सुटले पार्थ!

नवी मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय नेत्यांच्या जोरदार प्रचारसभा सुरु आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे देखील गेली काही दिवसांपासून प्रचारसभा घेत आहेत. अशीच पार्थ पवार यांची काल पनवेल येथे जाहीर सभा पार पडली. त्यांच्या सभेची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण या सभेला वेळेवर पोहचण्यासाठी पार्थ पवार हे गाडीतून उतरुन धावत सभास्थळी पोहचले होते.

झालं असं की काल पार्थ हे कर्जत, पनवेल, उरण परिसरात प्रचारासाठी गेले होते. त्यांच्या प्रचारार्थ रात्री पनवेल येथे सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला जात असताना पार्थ ट्रॅफिकमध्ये अडकले. त्यामुळे सभेला जायला उशिर होण्याची शक्यता होती. त्यामुळे पार्थ गाडीच्या खाली उतरले आणि चक्क धावत सुटले. धावतच त्यांनी सभेचे ठिकाण गाठले. गेल्या काही दिवसांपासून सभा, प्रचाराच्या ठिकाणी उशिरा पोहचण्यावरुन त्यांना टीकेला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी उशीर होऊ नये म्हणून धावतच सभेच्या ठिकाणी जाणे पसंत केले.

COMMENTS