लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवारांची प्रतिक्रिया,कार्यकर्त्यांचे मानले आभार !

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवारांची प्रतिक्रिया,कार्यकर्त्यांचे मानले आभार !

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पाच दिवसानंतर प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवारांनी ट्वीट केलं असून फक्त निवडणुकीसाठी नाही तर मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहिन, अशी प्रतिक्रिया पार्थ पवारांनी दिली आहे. तसेच मावळमधील मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि महाआघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमासाठी मी त्यांचे आभार मानतो, असंही पार्थ पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी 2 लाख मतांनी पराभव केला. निकालानंतर पाच दिवसांनी पार्थ पवारांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

तसेच पार्थ पवार यांच्या पराभवाबद्दल अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मावळमध्ये झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे. त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारची आहे. जनतेने या निवडणुकीत दिलेला कौल मी स्वीकारला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS