पार्थच्या खांद्यावर पिंपरी चिंचवडीची जबाबदारी

पार्थच्या खांद्यावर पिंपरी चिंचवडीची जबाबदारी

पुणे – सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगत होती. दरम्यान, अजित पवारांनी हे वृत्ततथ्य हीन असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पिंपरी-चिंचवडी महागरपालिकेची जबाबदारी पार्थ पवार यांच्या खांद्यावर दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे.

पिंपरी चिंचवडी महापालिकेत भाजपची सत्ता आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शांततेत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये गेलेल्या काही नगरसेवकांच्या घरवापसीसाठीही ‘राष्ट्रवादी’कडून प्रयत्न सुरू असून भाजपच्या नाराज गटाला चुचकारण्याचा प्रयत्नही ‘राष्ट्रवादी’कडून केले जात आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण जबाबदारी पार्थ पवार यांच्यावर टाकण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगत आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून पार्थ पवार यांचे शहरातील विविध भागांत दौरे वाढले आहे. त्याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.त्यामुळे मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारीचा विषय मागे पडला आहे

COMMENTS