पाटोद्यात पेरे-पाटलांच्या पॅनेलचा धुव्वा

पाटोद्यात पेरे-पाटलांच्या पॅनेलचा धुव्वा

औंरगाबाद: संपूर्ण राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा, हिवरेबजार, राळेगणसिध्दी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यापैकी पाटोद्यात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. भास्करराव पेरे यांनी त्यांचा संपूर्ण हयातीत पोटोदा या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. यात त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे. तब्बल 30 वर्षानंतर पेरे पाटील पाटोद्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

राज्यात 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. आज या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यासाठी सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण या गावाची किर्ती संपूर्ण राज्यात घेऊन जाणारे भास्कर पेरे यांनी त्याचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. यामध्ये त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांनीसुद्धा निवडणूक लढवली होती. मात्र, येथे भास्करराव पेरे यांच्या संपूर्ण पॅनेलचा पराभव झाला आहे. त्यांच्या मुलीसह त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.

निवडणूक जाहीर झाल्यापासून पेरे-पाटील गावात फिरकले नव्हते. ते राज्यभर व्याख्यान देत होते. एकूण 11 जागांपैकी 8 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांचे पॅनल पराभूत झाले आहे. येथील 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी विजय मिळवला आहे.

COMMENTS