नाना पटोलेंची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती !

नाना पटोलेंची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती !

मुंबई – भाजपचे माजी खासदार आणि काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या नाना पटोलेंची काँग्रेसमध्ये आता बढती करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाना पटोलेंची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राहुल गांधी यांनी याबाबतचं पत्र पाठवलं असून यामध्ये नाना पटोलेंची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी तर भाई नगराळे यांची जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती केली आहे.

दरम्यान राज्यातील शेतक-यांचे प्रश्न आणि भाजपच्या नेतृत्वाला कंटाळून नाना पटोले यांनी आपला खासदारकीचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन काही दिवसच उलटले असता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे सोपवली आहेत.

COMMENTS