शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा !

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा !

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आहे. या बैठकीत 6 मंत्र्यांना तुर्तास खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बेठकीला राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अजित पवार सहभागी झाले तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.

दरम्यान महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही मंत्र्यांचा खातेवाटप झालेला नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये येथे बैठक पार पडली. यावेळी खातेवाटपामध्ये फार दिरंगाई नको, खातेवाटप लवकर जाहीर करावे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 9 दिवस झाले मात्र अजुनही खातेवाटप जाहीर केलं नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे खातेवाटप लवकरात लवकर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS