मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये बैठक !

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये बैठक !

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज संध्याकाळी बैठक होत आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार करायचा की नाही यावर दोघांमध्ये चर्चा होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची विस्ताराची तयारी झाली असून दोघेही पक्ष काँग्रेसच्या यादीच्या प्रतिक्षेत आहेत. काँगेसची यादी आज अंतिम झाली नाही तर विस्तार करायचा की नाही याव चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्याचा शपथविधी लांबण्याची शक्यता देखील आहे
त्यामुळे आजच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारनंतर विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेणार. यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ही १३ मंत्री शपथ घेणार असून यातही १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री असणार आहेत. काँग्रेसचेही १० मंत्री शपथ घेणार असून यात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

COMMENTS