कोरोनामुळे निधन झालेल्या नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांची शरद पवारांनी घेतली भेट!

कोरोनामुळे निधन झालेल्या नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांची शरद पवारांनी घेतली भेट!

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनामुळे निधन झालेल्या नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पिंपरी चिंचवड येथे साने यांच्या कुटुंबियांचं सांत्वन पवारांनी केले. यावेळी शरद पवार यांनी दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे साने यांना मानले जात होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचा 4 जुलै रोजी कोरोनाने मृत्यू झाला होता. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. सुरुवातीला त्यांना काही प्रमाणात कोरोनाची लक्षणं आढळली होती. तेव्हापासून त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. याच दरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

COMMENTS