चंद्रकांत पाटलांनी एकदा निवडणूक लढवावीच, शरद पवारांचं थेट आव्हान !

चंद्रकांत पाटलांनी एकदा निवडणूक लढवावीच, शरद पवारांचं थेट आव्हान !

कोल्हापूर आयुष्यात कधी संधी मिळाली नाही तरी, सकाळ –दुपार- संध्याकाळ संधी घेतली जाते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी एकदा निवडणूक लढवावी, मग त्यांना समजेल, असं थेट आव्हान शरद पवारांनी केलं आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आहे. शेतकऱ्यांपासून सगळेच अडचणीत आले आहेत. धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात, मात्र आता ते निर्णय कोल्हापूर या उपकेंद्रातून घेतले जात आहेत अशी टीकाही शरद पवारांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. चंद्रकांत पाटील पुणे पदवीधरमतदार संघातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असं पवार म्हणाले. ते कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान सध्या देशातील साखर उद्योग संकटात असल्यामुळे साखरेवर 60 टक्के अधिभार लावा आणि ही रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणीही शरद पवारांनी केली आहे. सध्या साखरेचं गरजेपेक्षा जास्त उत्पादन झालं आहे. साखरेचा साठा कमी करण्यासाठी निर्यात वाढवायला हवी. जोपर्यंत साठा कमी होत नाही, तोपर्यंत बाजारभाव वाढणार नाही. त्यामुळे सरकारने साखर निर्यातीस चालना द्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS