शरद पवारांनी बोलावलेली बैठक निष्फळ,उदयनराजे चिडून बैठकीतून बाहेर पडले!

शरद पवारांनी बोलावलेली बैठक निष्फळ,उदयनराजे चिडून बैठकीतून बाहेर पडले!

मुंबई – साताय्रातील पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. कारण या बैठकीीतुन उदयनराजे हे चिडून बाहेर पडल्याने त्यांच्यातील वादावर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे नीरेच्या पाण्यावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद चांगलाच पेटला असल्याचं दि त आहे.

दरम्यान राज्यात नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राजकारण जोरदार तापलेले असताना उदयनराजे भोसले यांनी १४ वर्षे बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निबाळकरांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या टीकेला उत्तर देताना रामराजेंनी उदयनराजेंवर खालच्या पातळीवरील टीका केली होती. स्वयंघोषीत छत्रपती, चक्रम असे शब्दप्रयोग त्यांनी उदयनराजेंबाबत काढल्याने उदयनराजे चिडलेले होते. त्यानंतर आज साताऱ्यात उदयनराजेंच्या समर्थकांनी रामराजेंचा पुतळाही जाळला आहे. हा वाद मिटवण्यासाठी स्वत: शरद पवार यांनी मुंबईत बैठक बोलावली होती. परंतु ही बैठकही निष्फळ ठरली आहे.

COMMENTS