पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला धक्का, ‘हा’ नेता कार्यकर्त्यांसह करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला धक्का, ‘हा’ नेता कार्यकर्त्यांसह करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

पिंपरी-चिंचवड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला असून माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आज 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते याबाबतची घोषणा करणार आहेत.भापकर आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

दरम्यान शिवसेना-भाजप युतीवर भापकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना हा लबाड, स्वाभिमान शून्य आणि लाचार पक्ष असल्याची टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी भाजपविरोधात सर्वात जास्त आंदोलने केली होती. परंतु पुन्हा शिवसेनेनं भाजपशी युती केल्यामुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं भापकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

COMMENTS