नवीन कार खरेदी करणा-यांच्या खिशाला पडणार आणखी ताण, केंद्र सरकारची नवीन योजना !

नवीन कार खरेदी करणा-यांच्या खिशाला पडणार आणखी ताण, केंद्र सरकारची नवीन योजना !

मुंबई – नवीन कार घेणं आता आणखी महागात पडणार आहे. कारण केंद्र सरकारच्या नवीन योजनेनुसार नवीन कार घेणा-याला जादा 12 हजार रुपये भरावे लागणार आहेत. नवीन कार खरेदीवर 12 हजार रुपये ‘पोल्यूटर पे’ म्हणजे प्रदूषण शुल्क आकारण्यासाठी सरकार नियम बनवत असल्याची माहिती आहे. याबाबतचा ड्राफ्ट तयार झाला असून लवकरच या नव्या योजनेला अंतिम स्वरुप मिळणार आहे.

दरम्यान इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीकडे कल वाढावा या दृष्टीने हे पाऊल उचललं जाणार असल्याची माहिती आहे. तसेच या पैशांचा वापर इलेक्ट्रिक वाहन निर्मीती आणि त्यांच्या बॅटरी उत्पादनासाठी केला जाणार आहे. इलेक्ट्रीक टू-व्हिलर, थ्री- व्हिलर आणि कार खरेदी करणाऱ्यांना 25 ते 50 हजार रुपये सूट देण्यात यावी अशी मागणी कार उत्पादकांनी नीती आयोगाकडे केली होती. त्यानंतर सरकारकडून प्रस्ताव बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन कार खरेदीवर 12 हजार रुपये ‘पोल्यूटर पे’ ग्राहकांना भरावा लागणार आहे.

 

 

COMMENTS