खडसे आणि पंकजा मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

खडसे आणि पंकजा मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

मुंबई – भाजपमधील अंतर्गत वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. ओबीसी नेत्यांवर पक्षाकडून अन्याय झाला असल्याचा आरोप अनेक नेते करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच पक्ष सोडण्याचे संकेतही खडसे यांनी परळी येथील मेळाव्यात दिले आहेत. त्यामुळे
भाजपच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रामुख्याने खडसे आणि मुंडे यांच्या वादावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी माध्यमांना चक्क हात जोडले आहेत.

ठाण्यातील कोपरी येथे न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात जनकल्याणार्थी सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. यावेळी देवेंद्र फडणवीस ठाण्यात आले होते, माध्यमांनी या संदर्भात एकनाथ खडसे या विषयावर छेडले असता फडणवीस यांनी हात जोडून मुंबईला रवाना झाले.

COMMENTS