फोटो काढताना पाय घसरुन पडणा-या फोटोग्राफरला राहुल गांधींनी दिला आधार ! VIDEO

फोटो काढताना पाय घसरुन पडणा-या फोटोग्राफरला राहुल गांधींनी दिला आधार ! VIDEO

भुवनेश्वर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज ओडिशाच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान भुवनेश्वर विमानतळावर ते गेले असातना याठिकाणी राहुल गांधींची माणूसकी पुन्हा एकदा समोर आली आहे. या विमानतळावर राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. काही प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि फोटोग्राफरही होते. यादरम्यान राहुल गांधी यांचा फोटो काढत असताना एक फोटोग्राफर पाय घसरुन पडला असल्याची घटना घडली. यावेळी या फोटग्राफरच्या मदतीसाठी काही कार्यकर्ते धावले. या कार्यकर्त्यांसोबत स्वतः राहुल गांधीही सरसावले आणि त्या पडणा-या फोटोग्राफरला आधार दिला. तसेच त्याची विचारपूस देखील राहुल गांधी यांनी यावेळी केली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

COMMENTS