फुलचंद कराडांचा दावा ठरला फुसका, काही मिनिटांतच गडावरुन परतले !

फुलचंद कराडांचा दावा ठरला फुसका, काही मिनिटांतच गडावरुन परतले !

बीड – भगवान सेनेचे सरसेनापती तथा पंकजा मुंडे यांचे समर्थक फुलचंद कराड यांचा दावा अखेर आज फुसका ठरला आहे. वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून भगवान गडावर दाखल झालेल्या फुलचंद कराड यांनी काही मिनिटं मंदिरात बसून बैठक झाल्याचा दावा करीत आंदोलन यापुढे तीव्र करण्याचा इशारा दिला. गडावर मोठा पोलीस बंदोबस्त आणि जमावबंदी आदेश लागू असल्याने या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच अवघ्या काही मिनिटात कराड गडावरून रवाना झाले.

दरम्यान वंजारी समाजाला ओबीसीमध्ये घेण्यात यावे या मागणीवरुन भगवान सेनेचे सरसेनापती तथा पंकजा मुंडे यांचे समर्थक फुलचंद कराड यांनी भगवान गडावर मेळावा घेण्याचे जाहीर केले होते. त्याला नामदेव शास्त्री यांनी विरोध केला होता. त्यामूळे संघर्ष पेटण्याची चिन्हे होती. मात्र पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.तसेच कराड यांनी प्रतिकात्मक बैठक घेतल्याचे सांगून 16 सप्टेंबरला पुण्यात व्यापक मेळावा घेऊन आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

 

 

COMMENTS