पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी प्रश्नावरुन सर्वपक्षीयांचं आंदोलन, सत्ताधा-यांनी अधिका-यांवर फोडलं खापर !

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी प्रश्नावरुन सर्वपक्षीयांचं आंदोलन, सत्ताधा-यांनी अधिका-यांवर फोडलं खापर !

पुणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्यापूर्वी पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने जोरदार आंदोलन केलं आहे. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर झालेल्या या आंदोलनात सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी ही पाण्यासाठी आंदोलन करत पाणी टंचाईचे खापर अधिकाऱ्यांवर फोडले आहे.

त्याचबरोबर शहरातील पाणी प्रश्‍नावर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिका-यांनी देखील निदर्शने केली आहेत. तसेच भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली बादल्या घेऊन निदर्शने करण्यात आली आहेत.

तसेच पाणी प्रश्‍नावर लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांनी महापौरांना सभा चालू असताना पाण्याची बाटली देत आंदोलन केले आहे. सर्वपक्षीयांनीच आंदोलन केल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत वेगळंच वातावरण पहावयास मिळालं आहे.

COMMENTS