नेपाळमध्ये हेलिकॉप्टर अपघात, पर्यटन मंत्र्यासह सहा जणांचा मृत्यू !

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर अपघात, पर्यटन मंत्र्यासह सहा जणांचा मृत्यू !

काठमांडू  –  नेपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली असून हेलिकॉप्टर अपघातात पर्यटन मंत्र्यांसह 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.  आज दुपारच्या सुमारास पर्यटन मंत्र्यांसह जणांना घेऊन जाणारं एक हेलिकॉप्टर (चॉपर) पाथिभारा, तापलेजंग याठिकाणी क्रॅश झालं आहे. या अपघातात पर्यटन मंत्री रबिंद्र अधिकारी यांच्यासह सर्व जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती आहे. नेमकं हा अपघात कशामुळे झाला याबाबतची माहिती अजून प्राप्त झाली नसून अधिक तपास केला जात आहे.

COMMENTS