राज्यभरात प्लास्टिकवर बंदी, विकणारा आणि वापरणा-यावरही होणार कारवाई !

राज्यभरात प्लास्टिकवर बंदी, विकणारा आणि वापरणा-यावरही होणार कारवाई !

मुंबई – राज्यभरात प्लास्टिकवर बंदी करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. प्लास्टिकवर टप्प्याटप्प्याने राज्यभरात बंदी करण्यात येणार असल्याचं रामदास कदम यांनी विधानसभेत म्हटलं आहे. तसेच प्लास्टिक विक्री करण्यांऱ्याबरोबरच वापरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्लास्टिक बंदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्याची अखेर आज घोषणा करण्यात आली आहे. प्लास्टिक पिशव्या, ताटं, चमचे, टोप्या यावर तूर्तास बंदी घालण्यात आली असल्याचंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यभरात आता प्लास्टिक वापरणा-यांना आणि विकणा-यांना चांगलच महागात पडणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान प्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसल्यामुळे प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होते त्यामुळे या घातक प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे. प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी एक्सपर्ट कमिटी आणि एमपॉवर्ड कमिटीची स्थापना करण्यात येणार असून पाण्याच्या बाटल्यांवर तूर्तास बंदी घालण्यात आलेली नाही. परंतु मिनरल वॉटर कंपन्यांच्या लॉबीचा सरकारवर दबाव असल्याने तूर्तास PET बॉटल्सवरचा बंदीचा निर्णय पुढे ढकलला असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS