तेल दरवाढीसंदर्भात पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक !

तेल दरवाढीसंदर्भात पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक !

नवी दिल्ली – देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. याविरोधात काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यानंतरही इंधनाचे दर वाढत चालले आहेत. हे वाढते दर पाहता देशभरातून मोदी सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचीच दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून तेल दरवाढीसंदर्भात येत्या शनिवारी दुपारी ४ वाजता ७ लोककल्याण मार्ग येथे बैठक बोलविली आहे.

दरम्यान या बैठकीत देशभरातील तेल दरवाढीवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला पेट्रोलियम मंत्र्यांसह इतर नेते  उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी तोडगा काढला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS