विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या राज्यात सभा, असा असणार दौरा!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या राज्यात सभा, असा असणार दौरा!

मुंबई – राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यात सभा घेणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाच्या या दोन स्टार प्रचारकांपैकी मोदींच्या ९ तर शाहांच्या १८ सभा राज्यात होणार आहेत. यापैकी पंतप्रधानांची पहिली सभा १३ तारखेला जळगाव आणि विदर्भातील साकोली येथे होणार आहे. तर १६ तारखेला अकोला, पंढरपूर आणि पनवेलमध्ये होणार आहे. तसेच १७ तारखेला परळी, सातारा, पुणे आणि १८ तारखेला मुंबईत मोदींची सभा पार पडणार आहे.

दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज, संपणार आहे. त्यानंतर दसऱ्याचा मुहूर्त साधून प्रचाराला जोरदार सुरुवात होणार असून, राज्यासह राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभांमुळे वातावरण ढवळून निघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात प्रचारासाठी 9 ते 10 सभा घेणार आहे. विशेष म्हणजे परळीत सभा घेणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. यापूर्वी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी परळीत सभा घेतली होती.

COMMENTS