‘या’ दिवशी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ, अमित शाहांना मिळणार ‘हे’ पद ?

‘या’ दिवशी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ, अमित शाहांना मिळणार ‘हे’ पद ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे आता लवकरच पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. येत्या 26 तारखेला मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती आहे. शपथविधीनंतर त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवरचं नाव आहे, भाजप अध्यक्ष अमित शाह, जे गांधीनगर मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. अमित शाह यांना महत्त्वाचं खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान भाजप अध्यक्ष अमित शाह हे पहिल्यांदाच लोकसभेत निवडून आले आहेत. त्यामुळेे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीत अमित शाहांचा समावेश होऊ शकतो. सीसीएसमध्ये पंतप्रधानांसह, संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयाचे चार वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असतो. म्हणजे अमित शाह यांना यापैकी एक मंत्री बून शकतात अशी शक्यता आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, अमित शाह त्यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्यामुळे अमित शाह यांना केंद्र सरकारमध्ये गृहखातं दिलं जाऊ शकतं, अशीही चर्चा आहे.

COMMENTS