शिवसेनेची डोकेदुखी वाढणार, युतीबाबत पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना !

शिवसेनेची डोकेदुखी वाढणार, युतीबाबत पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना !

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित मानली जात आहे. जागावाटपाबाबत आजपासून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु होणार आहे. परंतु याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोणत्या अटींवर युती करायची याबाबत आपल्या पक्षातील नेत्यांना सूचना दिल्याची माहिती आहे. ‘शिवसेनेसोबत युती करा, तडजोड नाही,’ अशा थेट सूचना पंतप्रधान मोदींनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपकडून जास्त जागांची मागणी केली जाऊ शकते असं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान शिवसेना -भाजपमधील येत्या पाच दिवसांमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. भाजपतर्फे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांच्यासह इतर नेते चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार या दोन नेत्यांवर चर्चेची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात 288 जागांवर महायुतीचे उमेदवार हाच आमचा फॉर्म्युला असल्याचं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS