लष्करात काम करणा-या महिलांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा !

लष्करात काम करणा-या महिलांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा !

नवी दिल्ली – 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी लष्करात काम करणा-या महिलांना स्वातंत्र्यदिनानिमित्त भेट दिली आहे. लष्करातील महिलांसाठी स्थायी कमिशनची घोषणा करण्यात आली असून या माध्यमातून महिला सर्व पुरूषांप्रमाणे देशाची सेवा करू शकणार आहेत. शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे निवडलेल्या महिलांसाठी ही घोषणा केल्यामुळे महिलांना अधिक काळ सैन्य दलात काम करता येणार आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करदात्यांबद्दलही वक्तव्य केलं असून आज आपण प्रामाणिकपणा आणि करदायित्व या गोष्टीही साजरा करत आहोत. प्रत्येक करदात्याचा पैसा हा भारतातल्या तीन गरीब कुटुंबांचं पोट भरण्यासाठी वापरला जात असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. तसेचकाळ्या पैशाबाबत बोलताना त्यांनी वक्तव्य केलं असून सरकारच्या योजनांमध्ये तब्बल ९० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. सरकारी योजनांमध्ये तब्बल सहा कोटी बोगस लाभार्थी होते, ज्यांना मी बाजुला केले असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

COMMENTS