“पंतप्रधान मोदींना खुलं आव्हान, 15 मिनिटांमध्ये ‘हे’ करुन दाखवा !”

“पंतप्रधान मोदींना खुलं आव्हान, 15 मिनिटांमध्ये ‘हे’ करुन दाखवा !”

कर्नाटक – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना १५ मिनिटे कागद समोर न ठेवता भाषण करुन दाखवण्याचे आव्हान केले होते. यावरुन आता कर्नाटकमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला असून त्यांना खुले आव्हान केले आहे. मोदींनी केवळ १५ मिनिटांत कागदावर पाहून मागील येडीयुरप्पा सरकारची कामगिरी सांगावी असं खुलं आव्हान सिद्धरामय्या यांनी केलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्धरामय्या यांनाही टार्गेट केलं होतं. सिद्धरामय्या यांना प्रचारादरम्यान व्यासपीठावर झोप लागली होती, त्यावरुन मोदींनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र, मोदींच्या या टिप्पणीला सिद्दरामय्या यांनी उत्तर दिले असून पंतप्रधान विनाकारण अनावश्यक मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. आपल्याला ‘स्लीप एपनिया’ची समस्या असून त्यामुळे बऱ्याचदा दिवसा झोप लागते, यावर मी उपचारही घेत आहे. मात्र, मोदींनी माझ्या या समस्येवर अशा प्रकारे बोलण्याची गरज नव्हती असंही यावेळी सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

COMMENTS