दिल्लीतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींचं ट्वीट, म्हणाले…!

दिल्लीतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींचं ट्वीट, म्हणाले…!

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मतमोजणी सुरु असून दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 58 जागांचा निकाल हाती आला आहे. 58 पैकी आम आदमी पार्टीनं 52 जागांवर विजय मिळवला आहे. तर 6 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तसेच उरलेल्या 12 जागांपैकी आप 10 जागांवर आघाडीवर आहे तर 2 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

दरम्यान या निकालावरुन ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे.

या निकालानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन तेलं आहे. अरविंद केजरीवाल यांचे खूप खूप अभिनंदन… , दिल्लीकरांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना शुभेच्छा असं ट्वीट मोदींनी केलं आहे. दिल्लीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी केजरीवालांचं अभिनंदन केलं आहे.

COMMENTS