“भारताऐवजी दुसरा देश असता तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता !”

“भारताऐवजी दुसरा देश असता तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता !”

नवी दिल्ली – इथे भारताऐवजी दुसरा देश असता तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता असं वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केलं आहे. जीएसटी आणि नोटाबंदीवरुन त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.  जीएसटी गडबडीत लागू केल्याने व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना नुकसान झाले. तसेच देशात नोटबंदीने जीडीपी १.५ टक्के घसरला. त्यामुळे इथे भारताऐवजी दुसरा कोणता देश असता तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता असे सिब्बल नोटबंदीवरुन टीका करताना म्हटलं आहे. ‘शेड्‌स ऑफ ट्रुथ’ या सिब्बल यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान यावरुन माजी पंतप्रदान मनमोहन सिहं यांनी देखील मोदींवर टीका केली आहे. मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असून २०१४ ला दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचे ते म्हमाले आहेत.तसेच देशात आता इतर पर्यायांवर विचार करण्याची गरज आहे.

या सरकारच्या काळात शेतकरी आणि तरुण चिंतेत आहेत. तर अनूसुचित जाती आणि अल्पसंख्यांक समुदायात असुरक्षिततेची भावना आहे. देशात शषतकरी आंदोलन करत आहेत तर तरुण नोकरीच्या शोधात. देशातील औद्यागिक उत्पादन आणि विकास ठप्प झाला असल्याचा आरोपही मनमोहन सिंह यांनी केला आहे.

 

COMMENTS