सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक, लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवणार?

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक, लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवणार?

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केलीय. महाराष्ट्रात देशातील सर्वाधित १३६४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचा कहर पाहता, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अनुकूल असल्याची माहिती आहे.

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ‘परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसल्यानं लॉकडाऊनचा कालावधी कमीत कमी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढवला पाहिजे. कोणत्याही एखाद्या राज्यात लॉकडाऊन हटवणं योग्य नाही, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केलं. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार का याबाबतचा निर्णय लवकरच स्पष्ट होणार आहे.

देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे. मात्र अद्यापही भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने तो पुढे वाढवला जाण्याचे संकेत आहेत. मात्र लॉकडाऊन कायम राहणार, की संपणार, त्याची घोषणा कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

COMMENTS