शिवसेना-भाजपच्या युतीबाबत पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य !

शिवसेना-भाजपच्या युतीबाबत पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य !

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी देशातील विविध विषयांवर आपलं मत मांडलं आहे. सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयावरही त्यांनी आपली बाजू मांडली आहे.  तसेच यावेळी बोलत असताना त्यांनी एनडीएच्या घटक पक्षांबाबत सुचकं वक्तव्य केलं आहे. प्रादेशिक पक्षांना टाळता येणार नाही, प्रत्येक प्रादेशिक पक्षाची त्यांच्या पातळीवर एक ताकद असते. त्यामुळे आम्ही कधीच असा विचार करणार नाही की, त्यांची प्रगती झाली नाही पाहिजे. आम्ही कधी मोठं आहोत, असं सांगत नसल्याचंही यावेळी मोदींनी म्हटलं आहे.

तसेच जो ही पक्ष एनडीएला जोडला जातो, तो मोठा होतो. आमचा नेहमी प्रयत्न असतो, ते मोठे झाले पाहिजे. काही ठिकाणी त्यांच्या छोट्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांच्याकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. काही पक्ष चर्चा करण्याचा मार्ग निवडतात. राजकीय पक्षांचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. परंतु, आमचा प्रयत्न सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

यावरुन त्यांनी काँग्रेसलाही टोला लगावला आहे. काँग्रेसमध्ये जो पक्ष गेला, त्यांच्याशी भांडूनच बाहेर आला आहे. जेव्हा ते पक्ष काँग्रेसशी हातमिळवणी करतो, काँग्रेस  त्याचा बळी घेतो, अशी टीका मोदींनी केली आहे.

COMMENTS