पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर धमकीचा संदेश देण्यात आला आहे. हा संदेश मल्याळम भाषेत असल्याची माहिती आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ जून रोजी केरळमधील गुरूवायूर मंदिराला भेट दिली होती. त्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजेच ७ जून रोजी हा धमकीचा संदेश देण्यात आला होता अशी माहिती आहे. मालदीव दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान या मंदिरात भेटीसाठी गेले होते.

दरम्यान यापूर्वी दोन जून रोजी राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे दिली होती. राजस्थानमधील भाजपा अध्यक्ष मदन लाल सैनी यांना एक पत्र लिहून अज्ञात व्यक्तीनं मोदींना मारण्याची धमकी दिली होती. हे प्रकरण त्यावेळी तात्काळ पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तीन-चार संशयीत आरोपीची चौकशी केली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

COMMENTS